वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमधील गंगेरा हिल परिसरातील जंगलात भीषण आग लागली आहे. या आगीत नैसर्गिक संपदेची प्रचंड हानी झाली आहे. उधमपूरचे ब्लॉक फॉरेस्ट ऑफिसर भरम दत्त शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यात व्यग्र आहेत. वेगवेगळ्या भागात आग अजूनही सुरूच आहे. आगीमुळे जंगलाचा मोठा भाग जळून बेचिराख झाला असून कोट्यावधी ऊपयांचे नुकसान झाले आहे.