लाखो ऊपयांचे नुकसान : पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, अग्निशमनच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण
बेळगाव : रद्दी पेपर खरेदी करणाऱ्या दुकानांना भीषण आग लागल्याने पाच दुकाने आगीत जळून खाक झाली. मंगळवार दि. 17 रोजी मध्यरात्री 3 च्या सुमारास खंजर गल्ली येथे ही घटना घडली असून आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केल्याने यामध्ये मोटारसायकल, रेशन दुकान आणि सरकारी शाळेचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अथक परिश्र्रमानंतर सकाळी 6 च्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या भीषण आगीत लाखो ऊपयांचे नुकसान झाले. खंजर गल्लीतील आगीच्या घटनेमुळे नावगे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल पॅक्टरीला लागलेल्या आगीची घटना ताजी झाली.
खंजर गल्लीत रद्दी पेपर खरेदी करण्याची दुकाने आहेत. त्याठिकाणी ग्राहकांकडून रद्दी पेपर खरेदी करून ते साठविले जातात. मात्र, मंगळवारी मध्यरात्री 3 च्या दरम्यान एका दुकानाला अचानक आग लागली. ही आग बघता बघता बाजूच्या दुकानांमध्येही पसरली. त्यामुळे सर्व दुकानांनी पेट घेण्यास सुऊवात केली. धुरीचे लोळ पसरण्यासह आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील रहिवाशांची एकच धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी सुऊवातीला स्थानिकांनी प्रयत्न केले.
मात्र, आटोक्मयात येत नसल्याचे लक्षात येताच ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळानंतर अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करण्यास सुऊवात केली. पण, आग आटोक्मयात येत नसल्याने अतिरिक्त पाण्याचे बंब मागविण्यात आले. रात्री 3 च्या दरम्यान लागलेली आग सकाळी 6 नंतर आटोक्मयात आली. पण, यामध्ये पाच दुकाने संपूर्ण जळून खाक झाली. त्याचबरोबर तेथील मोटारसायकल, रेशन दुकान आणि सरकारी शाळेचेही यामध्ये नुकसान झाले. या दुर्घटनेत लाखो ऊपयांचे नुकसान झाले असून केवळ सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्याचबरोबर महानगरपालिकेतील विरोधी गटनेते नगरसेवक मुज्जमिल डोणी यांनीही भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती त्यामुळे अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.









