Shivaji University Kolhapur : शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र व संवादशास्त्र अँड जर्नलिझम विभाग आणि मास कम्युनिकेशन विभाग हे दोन्ही विभाग स्वतंत्र क रण्यात आले आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने आधी सभेत ठराव करून निर्णय घेतला आहे. याच्या अंमलबजावणीला मंगळवार 30 मे पासून सुरुवात झाली आहे. तसेच मासकम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र अधिकृत इमेल आयडी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता मास कम्युनिकेशनच्या समन्वयक पदाचा कार्यभार डॉ. शिवाजी जाधव यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने नुकताच जाहीर केला आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशानुसार मंगळवारी दोन्ही विभाग स्वतंत्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सप्टेंबर 2022 मध्ये जर्नलिझम विभागाशी निगडीत असलेल्या मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला.मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये कोणताही ठराव न करता हा निर्णय घेणे योग्य नाही असा मुददा उपस्थित करून डॉ. मुढे यांनी डॉ. जाधव यांना मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या समन्वयकपदाची सूत्रे सोपवण्यास नकार दिला होता. मात्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी समन्वयकपदाची जबाबदारी प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांच्याकडे सोपवली. दरम्यान 28 मार्च रोजी मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत मास्क कम्युनिकेशन विभाग वेगळा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या गोष्टीला दोन महिना होऊन गेले तरी डॉक्टर जाधव यांच्याकडे समन्वयक पदाचा चार्ज न दिल्याने ,विद्यापीठ प्रशासनाने डॉ. मुडे यांना डॉ. जाधव यांच्याकडे समन्वयक पदाचा चार्ज देण्याच्या सुचना दिल्या आहेत. या प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली.
कुलगुरूंना घडला प्रकार सांगणार
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . डी .टी .शिर्के आणि प्रकुलगुरू डॉ. पी. एस .पाटील दोन्ही अधिकारी नसताना समन्वयक पदाचा चार्ज डॉक्टर जाधव यांच्याकडे देण्याच्या सूचना आस्थापनाने दिल्या आहेत. तरी कुलगुरू व प्रकुलगुरू यांची भेट घेऊन घडला प्रकार त्यांना सांगणार आहे त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. मंगळवारी अधिविभागाचे वरिष्ठ लिपिक नसल्याने , तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या बैठक रूमला लॉक केले आहे. कारण या रूममध्ये महत्त्वाचे कागदपत्रे आहेत.
डॉ. निशा पवार ( वृत्तपत्र व संवादशास्त्र अँड जर्नलिझम विभागप्रमुख )
मॅनेजमेंट कौन्सिलचा निर्णय झाल्यानंतर चार्ज मिळणे अपेक्षित
सप्टेंबर महिन्यात मास कम्युनिकेशन विभाग जर्नालिझम पासून वेगळा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर 28 मार्चला मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत ठराव मंजूर करून मास कम्युनिकेशन विभागाच्या समन्वयक पदी माझी नेमणूक करण्यात आली होती त्यावेळेस या पदाचा चार्ज माझ्याकडे देणे अपेक्षित होते.
डॉ. शिवाजी जाधव( वृत्तपत्र व संवादशास्त्र अँड जर्नलिझम प्राध्यापक)