पाकिस्तान सरकारने भारताच्या कारवाईत मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. पाक सरकारच्या या योजनेचा सर्वाधिक लाभ क्रूर दहशतवादी अझहर मसूदलाच मिळणार आहे. अझहर मसूदची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयावर भारताने एअरस्ट्राइक केला होता. या कारवाईत जैशच्या मुख्यालयाचे मोठे नुकसान झाले हेत. याचबरोबर मसूदच्या कुटुंबातील 10 सदस्य मारले गेले होते. तसेच त्याचे 4 निकटवर्तीयही ठार झाले होते. आता या सर्वांच्या मृत्यूची भरपाई म्हणून अझहर मसूदला 14 कोटी रुपये मिळणार आहेत. अशाप्रकारे पाकिस्तान सरकारकडून मदतीच्या नावावर जारी रक्कम थेट स्वरुपात दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. पाकिस्तान पीएमओकडून एक कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा करण्यात आली होती. आता मदतीच्या नावावर जारी या रकमेचा थेट लाभ मसूद अझहरलाच होणार आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हाफिज सईदच्या मुरिदक येथील दहशतवादी अड्डा आणि बहावलपूर येथील जैशच्या अ•dयांना नष्ट करण्यात आले होते. बहावलपूर येथील भारताच्या भीषण हल्ल्यामुळे दहशतवादी म्होरके हादरून गेले होते. जैशच्या या मुख्यालयाला उस्मान अली परिसर या नावानेही ओळखले जाते.मसूदनेच स्वत:च्या परिवारातील 10 सदस्य मारले गेल्याचे मान्य केले होते. या हल्ल्यात त्याची मोठी बहिण, बहिणीचा पती मारला गेला होता. तसेच भाचा, त्याची पत्नी, भाची तसेच तिची 5 अपत्यंही मारली गेल्याचे समोर आले होते. आता या सर्वांच्या कायदेशीर वारस मसूद अझहरच आहे. अशा स्थितीत पाकिस्तान सरकारकडून मिळणरी रक्कम थेट त्याच्या खात्यात जमा होणार आहे. याचबरोबर 4 अन्य निकटवर्तीयांच्या नावावर जारी होणारी भरपाईही त्यालाच मिळण्याची शक्यता आहे.









