जगात असे अनेक वैज्ञानिक झाले असतील जे स्वत:च्या संशोधनासाठी कुठल्याही थराला जाण्यास तयार असतील. अनेक लोकांनी तर स्वत:ला कित्येक महिन्यापर्यंत खोलीत बंद करून संशोधन केले. तर अनेकांनी स्वत:चे आयुष्यच संशोधनाला वाहिले आहे. परंतु सध्या जपानमधील एक वैज्ञानिक अत्यंत चर्चेत आहे, त्याने संशोधनाच्या नावावर केलेले कृत्य प्रत्येकाला दंग करू सोडत आहे. या व्यक्तीने एक वर्षापर्यंत पक्ष्याचा मुखवटा परिधान केला असून यामागील कारण अत्यंत रंजक आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ टोकियोतील सहाय्यक प्राध्यापक तोशीताका सुझी यांनी अलिकडेच एक छायाचित्र शेअर केले असून जे त्यांच्या एका सहकाऱ्याचे आहे. या छायाचित्रात दिसून येणाऱ्या व्यक्तीने पक्ष्याचा मुखवटा परिधान केला आहे. हे छायाचित्र जपानच्या नागानो पर्फेक्चरमध्ये काढण्यात आले हेते.
माझे एक सहकारी टिट्स पक्ष्यावर संशोधन करत होते. या पक्ष्यांशी मैत्री करण्याची त्यांची इच्छा होती. याचमुळे त्यांनी त्या पक्ष्याचा मुखवटा तयार करवून घेत तो परिधान करत जंगलांमध्ये जाण्याचो सत्र आरंभिले होते. या मुखवट्याद्वारे ते पक्ष्यांना स्वत:कडे आकर्षित करू पाहत होते. त्यांचे हे संशोधन अनेक दिवस चालले. सुमारे 1 वर्षांपर्यंत ते पक्ष्याचा मुखवटा परिधान करत होते. पक्ष्याच्या अनेक प्रजाती मानवी चेहऱ्यांना ओळखत असल्याचे आणि त्या अजब आवाज काढू लागत असल्याचे वैज्ञानिकाने शोधून काढले आहे. आपण टिट्स पक्ष्याच्या ब्लॅकलिस्टमध्ये आल्याचे मानून वैज्ञानिकाने मुखवटा परिधान करण्यास सुरुवात केली होती.
संशोधनाचे काय झाले?
मुखवटा परिधान करून हा वैज्ञानिक पक्ष्यांच्या आवाजावर अध्ययन करू पाहत होता. प्रथम पक्ष्यांच्या घरट्यानजीक जाऊन त्यांच्या पिल्लांवर संशोधन करत होते. मग पक्ष्यांच्या आवाजावर त्यांनी संशोधन केले. परंतु पक्षी त्यांचा आवाज ओळखून जोरजोरात ओरडू लागत होता. यामुळे ते मुखवटा परिधान करून घरट्यानजीक जाऊ लागले. हा अजब प्रकार करूनही वैज्ञानिकाचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. मुखवटा परिधान करून पक्ष्यांनजीक जाऊ लागताच पक्षी त्रासदायक सुरात ओरडू लागत होते अशी माहिती प्राध्यापक सुझुकी यांनी दिली आहे.









