बेंगळूर :
मंगळूर जिल्ह्यातील धर्मस्थळ येथील कथित शेकडो मृतदेह प्रकरणासंबंधी तक्रार देणाऱ्या ‘मास्क मॅन’ चिन्नय्या याची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. बेळतंगडी तालुका जेएमएफसी न्यायालयाने चिन्नय्याला जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. मृतदेह दफन केल्याचे सांगणाऱ्या चिन्नय्याने एसआयटीच्या पथकाची दिशाभूल केल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याने जामिनासाठी बेळतंगडी तालुका न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. यावेळी एसआयटीच्या वकिलांनी प्रतिवाद करताना, चिन्नय्याला जामीन दिल्यास तपासात अडथळे येतील. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती केली होती. चिन्नय्या सध्या शिमोगा जिल्हा कारागृहात आहे.









