प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना पूर्णतः गेला नाही. सध्या दिल्लीतील परिस्थिती पाहता आपण शक्मय तितकी सुरक्षितता पाळली पाहिजे, यासाठीच रेडक्रॉस संस्था व वेदांत फौंडेशन विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रतीचे मास्क वितरित करीत आहे, असे प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी सांगितले. लक्ष्मी टेकडी, गणेशपूर येथील रेडक्रॉस संस्थेच्या कार्यालयात मास्क वितरण आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, रेडक्रॉस संस्था सध्या 189 देशांमध्ये कार्यरत असून युद्धकाळात तसेच नैसर्गिक संकट काळात अविरत सेवा देत आहे. यापुढे आम्ही ज्युनिअर रेडक्रॉस सुरू करून भावी पिढीला देशसेवेत सज्ज करू.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेडक्रॉसचे बेळगाव जिल्हाप्रमुख अशोक बदामी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विनोदिनी शर्मा, सतीश पाटील, सविता चंदगडकर, वाघू पाटील, सुनील देसूरकर, भाग्यश्री पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत सुनील देसूरकर यांनी केले. सविता चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले. यावेळी तालुका व शहरातील 2500 विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांकडे मास्क सुपूर्द केले.









