हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थित
डिचोली : तळेवाडा नार्वे येथील प्रसिद्ध मसणदेवीची जत्रा कखल मंगळ. दि. 5 सप्टें. रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. संपूर्ण राज्यात साजरी होणारी हि एकमेव जया असून ती श्रावण महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी साजरी होते. एखादी मागणी केल्यानंतर ती पूर्ण व्हावी म्हणून जलत्रनवस बोलला तर ती मागणी पूर्ण होतेच, अशी भाविकांची श्र्रध्दा आहे. या जत्रोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. तळेवाडा नार्वे येथे देवीचे लहान मंदिर असून त्या मंदिरासमोर.असलेल्या पेडामध्ये एक काजऱ्याचे झाड आहे. एखादी गरोदर महिला, रजस्वला अवस्थेत मृत्यू होणाऱ्या महिलांना या देवीच्या मंदिर परिसरात आणून दफन केले जाते. त्या अवगतीपासून बाधा होऊ नये यासाठी एक खिळा तांब्याच्या नाण्यासह या काजऱ्याच्या झाडाला ठोकण्याची परंपरा आहे. त्यामुळे मृतात्म्या?चा त्रास होत नाही, अशी आख्यायिका सांगितली जाते. ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, त्यांनी नवस बोलल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होते. या ठिकाणी सजविण्यात येणाऱ्या उत्सवमुर्तीची भाविक खणनारळांनी ओटी भरून आपला नवस बोलतात. काही लोक पाळणे वाहतात. संपूर्ण दिवस देवदर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी कोणीही रहायचे नसते. रात्रीच्या वेळी या भागात भुतांचा वावर असतो, त्यामुळे रा भागात कोणीही राहत नाही, असे सांगितले जाते. काल मंगळवारी या जत्रेनिमित्त तळेवाडा येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हजारोंच्या संख्येने भाविकांनी देवीचे तसेच काजऱ्याच्या झाडाचे दर्शन घेतले. जत्रेनिमित्त विविध प्रकारचे सामान विक्री करणाऱ्या विव्रेत्यांनी दुकाने थाटली होती. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मसणदेवीचे दर्शन घेतले. सर्वांना या जत्रेच्या शुभेच्छा दिल्या.









