मुंबई
मारुती सुझुकी इंडियाची नवी आल्टो के 10 वर आधारीत टूर एच 1 ही व्यावसायिक प्रकारातील कार नुकतीच बाजारात उतरवण्यात आली आहे. सदरच्या गाडीची किमत 4.8 लाख रुपये इतकी एक्सशोरुम असणार आहे. गाडी उत्तम मायलेज देणार आहे, असे सांगितले जात आहे.
यातील सीएनजी मॉडेलची किंमत ही 5.7 लाख रुपये इतकी असणार आहे. 1 लिटर पेट्रोल इंजिनसह गाडीत आरामदायी बसण्याची सोय असणार असून अनेक सुरक्षेची वैशिष्ट्यो यात दिल्या आहेत. पेट्रोल व एस-सीएनजी इंधनाच्या पर्यायासह ही गाडी येणार असून पेट्रोल इंधनावरची टूर 24.60 किलोमीटर प्रति लिटर तर एस-सीएनजीवरील टूर 34.46 किलोमीटर प्रति किलोग्रॅम इतके मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.









