13 लाख रुपये किंमत ः 26 किलोमीटरचे मायलेज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मारुती सुझुकी या दिग्गज कंपनीने नुकतीच आपली प्रिमीयम एसयुव्ही गटातील ग्रँड विटारा सीएनजीवर आधारीत बाजारात सादर केली आहे. सदरच्या गाडीची किंमत 13 लाख रुपयांच्या आत असेल, असे सांगितले जात आहे.
कंपनी याअंतर्गत डेल्टा व जेटा अशी दोन व्हेरियंटस् सादर करत आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार सदरची नवी कार 26 किलोमीटर प्रति किलो इतके मायलेज देणार आहे. ग्रँड विटाराची डेल्टा या कारची (एक्सशोरुम, दिल्ली) किंमत 12.85 लाख रुपये इतकी असणार असून जेटाची किंमत 14.84 लाख रुपये इतकी असणार आहे. या एसयुव्हीला 1.5 लिटरचे इंजिन असणार आहे. ग्रँड विटाराच्या सीएनजी मॉडेलवर 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स असून सेल्फ चार्ज बॅटरी व सनरुफची सोयही यात असणार आहे. सुव्हमध्ये पेट्रोल इंजिन आणि मोटर असेल. याची बॅटरी आपोआप चार्ज होणारी आहे.
काय असतील सुविधा पाहा…
सनरुफसह व्हेंटीलेटेड सीट, मल्टीपल ड्राइव्हिंग मोडसारखी वैशिष्टय़े असणार आहेत. यात हिल होल्ड असिस्ट, रियर डिस्क ब्रेक, हिल डिसेंट कंट्रोल यासह पॅनारोमिक सनरुफ, 360 डिग्रीचा कॅमेरा, वायरलेस चार्जर अशाही सुविधा मिळणार आहेत. शिवाय 6 एअरबॅग्ज गाडीत असणार आहेत.









