टोयोटा 2.17 कोटींची गाडी ः ऑटो एक्स्पोमध्ये एसयूव्हीचा समावेश
नवी दिल्ली
स्पोर्ट्स युटिलिटी वाहने (एसयूव्ही) आणि बहुद्देशीय वाहने (एमपीव्ही) ऑटो एक्स्पो 2023 मध्ये वर्चस्व गाजवत आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, टाटा, एमजी, किया आणि टोयोटा यांनी त्यांच्या एसयूव्हींचे प्रदर्शन केले आहे. लक्ष वेधून घेणाऱया कारमध्ये मारुतीची जिम्नी आहे, ज्याची किंमत ही अजून निश्चित केलेली नाही.
मात्र या कारची किंमत ही 12 लाखांपर्यंत असू शकते, असे सांगितले जाते. मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी म्हटले आहे, की या गाडीचे बुकिंग हे 11 हजारांमध्ये उपलब्ध होणार असून याची सुरुवात ही एप्रिलपासून करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. जिम्नी व्यतिरिक्त, टाटाने लहान एसयूव्ही पंचचे सीएनजी मॉडेलदेखील प्रदर्शित केले. टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेईकल्सचे उपाध्यक्ष रंजन अंबा म्हणाले, की मॉरिस गॅरेजेस म्हणजेच एमजीने 5,6 आणि 7 सीटर हेक्टर लाँच केली आहे. एमजी इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर (सीसीओ)गौरव गुप्ता यांनी सांगितले, की कंपनीचे लक्ष कॉम्पॅक्ट आणि मोठय़ा एसयूव्ही दोन्ही वाहनांवर आहे.
ऑटो एक्स्पोमधील अन्य बाबी……
-मारुतीने नवीन एसयूव्ही जिम्नी आणि प्रँक्ससाठी बुकिंग सुरु केले आहे. नेक्सा शोरुममध्ये 11,000 मध्ये बुकिंग सुविधा दिली आहे.
-मारुती बेझाची सीएनजी आवृत्तीही सादर
– टाटा मोर्ट्सने लहान एसयूव्ही पंचची सीएनजी आवृत्ती सादर केली असून यामध्ये डबल सिलिंडर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे
-एमजीने हेक्टर फेसलिफ्ट मॉडेल्सचे अनावरण केले
-कियाची नवीन कार्निव्हल केए4 यांचे लाँचिंग केले आहे.
-टोयोटा इनोव्हा हायक्रॉस व लँड क्रूझर 300 चे सादरीकरण करण्यात आले.









