कारमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा : शोरुम टेस्ट ड्राईव्ह, बुकिंगसाठी उपलब्ध
बेळगाव : शहरातील मारुती सुझुकीची आघाडीची डीलर शांतेशा मोटर्सने शनिवारी बहुप्रतिक्षित मारुती सुझुकी व्हिक्टोरिस एसयुव्ही कार लाँच केली. ग्राहकच सर्वस्व या भावनेने शांतेशा मोटर्सने ग्राहकांच्या हस्ते नव्या कारचे लॉचिंग केले हे विशेष. ग्राहकांना अग्रस्थानी ठेवून ज्या ग्राहकांनी आधीच या कारचे बुकिंग केले होते, त्यांच्याच हस्ते कार लाँच करण्यात आली. या अनोख्या कृतीने शांतेशा मोटर्सने ग्राहकांप्रति विश्वास व निष्ठा अधोरेखित केली. 1999 मध्ये स्थापन झाल्यापासून 25 वर्षांहून अधिक काळ ग्राहकांनाच केंद्रबिंदू ठेवून वाटचाल करण्यात येत आहे.
आमचे ग्राहकच आमच्या यशाचा पाया असून तेच आपल्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहेत. व्हिक्टोरिस ही कार मॉडर्न भारतीय कुटुंबीयांना लक्षात घेऊन डिझाईन केली आहे. मारुती सुझुकी ही अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी व सुरक्षा पॅकेजचे एक मजबूत मिश्रण आहे. यामुळे स्पर्धात्मक एसयुव्ही विभागात एक नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. मारुती सुझुकीवर विश्वास ठेवून ग्राहकांनी आधीच कारचे बुकिंग केले होते. यामुळे त्यांच्याच हस्ते नव्या व्हिक्टोरिसचे अनावरण करणे आमच्यासाठी भाग्याचे आहे. ही नवी कार बेळगावमधील शांतेशा मोटर्समध्ये शोरुममध्ये टेस्ट ड्राईव्ह व बुकिंसाठी उपलब्ध आहे.
‘व्हिक्टोरिस’ची प्रमुख वैशिष्ट्यो…
5 स्टार सुरक्षा रेटिंग
व्हिक्टोरिसला भारत एनसीएपी व आंतरराष्ट्रीय एनसीएपी या दोन्हींकडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. यामध्ये 6 एअरबॅग्स व चारही चाकांना डिस्क ब्रेक प्रदान करण्यात आले आहेत.
लेव्हल-2 एडीएएस
मारुती सुझुकीचे हे पहिले मॉडेल आहे, ज्यामध्ये लेव्हल-2 अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) आहे. तसेच अॅटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, अॅडप्टीव्ह व्रुझ कंट्रोल व लेन किप असिस्ट आदी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
प्रिमियर इंटेरिअर
मोठा पॅनोरामिक सनरुफ, 64-कलर अँबियंट लाईटिंग, डॉल्बी अॅटमोस सपोर्टसह 8 स्पिकर इन्फिनिटी बाय हर्मन साऊंड सिस्टिमचा समावेश आहे.
आरामदायी
लाँग ड्राईव्हसाठी ड्रायर्व्हसना 8 वे पॉवर्ड सीट व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्सचा समावेश केला आहे.
ड्युअल डिजीटल डिस्प्ले
10.1 इंच स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट, 10.25 इंच पूर्णपणे ड्रायव्हर्स डिस्प्लेचा एक उच्चतंत्रज्ञान कॉकपिट तयार केला आहे.
इफिशियंट पॉवर
व्हिक्टोरिसमध्ये अनेक पॉवरट्रेन पर्याय असून 28.65 पर्यंत मायलेज देणारा इंधन कार्यक्षम मजबूत हायब्रिड पर्याय देण्यात आला आहे. माईल्ड-हायब्रिड पेट्रोल व बूट स्पेस जतन करण्यासाठी अंडर बॉडी माऊंटेड टँकसह या श्रेणीतील पहिला एस सीएनजीचाही समावेश करण्यात आला आहे.









