वृत्तसंस्था/मुंबई
देशातील आघाडीवरची कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या कार्सच्या किंमती नव्याने कमी केल्या आहेत. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी दरात कपात केल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना मिळवून देण्यासाठी मारुती सुझुकीने आपल्या कार्सच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकीने एस प्रेसो या गाडीवर सर्वाधिक 1 लाख 29 हजार 600 रुपये इतकी सवलत जाहीर केली आहे. सर्वात कमी सवलत जिम्नी या गाडीवर 51 हजार 900 रुपय्यांची आहे. एस प्रोसोची नवी एक्सशोरुम किंमत आता 3 लाख 49 हजार 900 रुपये इतकी राहणार आहे. आल्टो के 10 वर 1 लाख 7 हजार रुपये सवलत असेल.









