नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया यांनी आगामी काळामध्ये व्यवसाय विस्तारावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय असणाऱ्या कंपनीने मार्च 2025 पर्यंत 57 नेक्साच्या नव्या शोरूम्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल्सना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन कंपनी आपल्या शोरूम्सचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. देशामध्ये सध्याला नेक्साच्या 468 शोरूम्स आहेत. 2015 जुलैमध्ये द्वारका, नवी दिल्ली येथे पहिले शोरूम सुरू करण्यात आले होते.
नेक्साचा विक्रीत वाटा वाढला
मारुती सुझुकीच्या एकूण कार विक्रीच्या हिस्सेदारीत नेक्सा शोरूम अंतर्गत होणाऱ्या कार विक्रीचा वाटा हा 30 टक्के इतका आहे. 2022 आर्थिक वर्षांमध्ये 22 टक्के इतका वाटा होता.