नोएडा :
भारतातील दिग्गज कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने आपल्या 2 कार्सच्या किमती वाढवल्याची माहिती मिळते आहे. कंपनीने ही वाढ आपल्या इर्टिगा व बलेनो या दोन मॉडेलवर केली असल्याचे समजते. 0.5 टक्के ते 1.4 टक्के इतकी किंमतीत वाढ केली असून अर्टिगा, बलेनो मॉडेलमध्ये नव्या नियमानुसार 6 एअरबॅग्ज समाविष्ट केल्या आहेत. सदरच्या दोन्ही मॉडेलच्या किमती 16 जुलैपासून वाढवल्या आहेत. बलेनोची किमत 6.7 लाख रुपयांपासून सुरु होते तर इर्टिगाची 8.97 लाख रुपये पासून किंमत सुरु होते.
जूनमध्ये 1.68 लाख कार्सची विक्री
याचदरम्यान मारुती सुझुकीने जून 2025 मध्ये एकंदर 1.68 लाख कार्सची विक्री केली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता विक्रीत 6 टक्के घट आहे. जून 2024 मध्ये मारुतीने 1.79 लाख कार्स विक्री केल्या होत्या.









