फिट इंडिया युवा संघ मच्छेतर्पे मॅरेथॉन आयोजन
बेळगाव : फिट इंडिया युवा संघ यांच्यावतीने मच्छे येथे ब्रह्मलींग यात्रेनिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मारुती पाटील, प्रताप बाबू बावदाने .नकोशा महादेव मंगनाकर, सोनम अकनोजी यानी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत विविध ग्रामिण भागातील स्पर्धकांनी भाग घेऊन या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळजवळ शंभरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. मुलांसाठी 10 किलो मी.ची स्पर्धा व मुलींसाठी 7 किलो मी.ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. पद्मराज पाटील यांच्या हस्ते ध्वज उंचवून करण्यात आले.
स्पर्धेच्या निकाल पुढिल प्रमाणे
मुलांच्या 10 किलो मी.च्या स्पर्धेत अनुज मारुती पाटील( गणेशपुर) याने 38 मिनिटे पाच सेकंदाचा वेळ घेत स्थान प्रथम स्थान पटकावले. दुसरा क्रमांक गोविंद डी यांनी पटकाविला तिसरा क्रमांक राहुल राजू वसुरकर यांनी पटकाविला. चौथा क्रमांक भूषण चंद्रकांत शिंदे पटकाविला. पाचवा क्रमांक सत्यम रॉय पटकाविला. (बेळगाव) गाव मर्यादित प्रताप बाबू बावदाने .प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. याचबरोबर मुलींच्या 7 किलो मीटरच्या स्पर्धेत मच्छे गावच्या नकोशा महादेव मंगनाकरने प्रथम क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांकाची क्रांती सोमनाथ वेताळ (कल्लेहोळ), तिसरा क्रमांक मानकरी शिवानी युवराज शेलार (अनगोळ), चौथ्या क्रमांक दक्षता पाटील(जुने बेळगाव). पाचव्या क्रमांक प्रतीक्षा बंडू कुंभार (जुने बेळगाव) मानकरी ठरले. तर गाव मर्यादेत प्रथम क्रमांक सोनम जोतिबा अकनोजी मानकरी ठरली.
फिट इंडिया युवा संघाच्या वतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण जेष्ठ क्रीडा शिक्षक हर्षवर्धन शिंगाडे,शंकर कोलकार आणि नागेंद्र नारायण काटकर यांच्याहस्ते या सर्व धावपटूंना रोख रक्कम व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर या स्पर्धेसाठी सहाय्य केलेल्या देणगीदारांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. पद्मराज पाटील, अजित लाड, एकनाथ कलखामकर, उदय चौगुले, विनोद पाटील, संजय सुळेकर, गजानन मंगनाकर, मयूर घाडगे, विक्रम लाड,यल्लाप्पा सुळगेकर आनंद बेळगावकर, ग्रामीण पोलीस एएसआय इनामदार व विठ्ठल नाईक, सुनील जाधव उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यसाठी कार्यकर्ते श्रीहरी लाड, ज्योतिबा कणबर्गी, सुरज देसाई, भोमानी लाड, विक्रम लाड किशोर लाड, गणेश लाड, राहुल शहापूरकर, सुरज अनगोळकर आकाश लाड, प्रदीप बेळगावकर ,चेतन येळळूरकर, यल्लाप्पा सुळगेकर, सचिन चोपडे, अभिषेक चलवेटकर, आनंद अनगोळकर, मयूर घाडगे विशेष परिश्रम घेतले.









