हिंडलगा : सुळगा (हिं.) येथील मराठी शाळा सुधारणा कमिटीच्या नूतन पदाधिकाऱयांची निवड पार पडली. माजी अध्यक्ष मारुती पाटील यांची तिसऱयांदा कमिटी अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवानी पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली.
सदस्यपदी सागर सांगावकर, भावकू पाटील, भरमा कोवाडकर, राजू पाटील, गणपत कलखांबकर, नारायण पाटील, अमृत तुप्पट, प्रशांत तुप्पट, ज्योती पाटील, गीता पाटील, सोनाली चौगुले, पूनम पाटील, रेखा पाटील, कविता कणबरकर, सुजाता यादव, शिल्पा नाईक यांची निवड केली. निवडणूक प्रक्रिया निवड कमिटी सदस्य व ग्रामपंचायत अध्यक्षा निर्मला कलखांबकर, पीडीओ वीणा हलवाई, सदस्य यल्लाप्पा कलखांबकर, भागाण्णा नरोटी, मारुती पाटील, वर्षा सांगावकरांच्या उपस्थितीत पार पडली.









