बलेनो आरएस मॉडेलच्या व्हॅक्युम पंपात दोषः 7 हजारहून गाडय़ा दोषयुक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी मारुती सुझुकीने अंतर्गत दोषाच्या कारणास्तव आपल्या बलेनो गाडय़ा परत मागवल्या आहेत. कंपनीने जवळपास 7213 बलेनो आरएस गाडय़ा परत मागवल्याची माहिती आहे.
सदरच्या गाडीमध्ये व्हॅक्मयुम पंपामध्ये दोष असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 27 ऑक्टोबर 2016 ते 1 नोव्हेंबर 2019 या दरम्यान तयार करण्यात आलेल्या बलेनो आरएस या हॅचबॅक कारबाबत हा दोष आढळून आला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत विपेत्यांना यासंदर्भात माहिती दिली असून त्यांनी कार मालकांना दोषासंदर्भात सुचित केले आहे. वरील कालावधीमध्ये खरेदी केलेल्या बलेनो ग्राहकांनाही कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.
दोषासंदर्भात दुरुस्तीकरता शुल्क नाही
सदरचा दोष गाडी मागवल्यानंतर दुरुस्त करून देण्यात येणार असून त्यासाठी ग्राहकाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचा खुलासाही कंपनीने यादरम्यान केला आहे.
काय प्रॉब्लेम सतावतोय….
व्हॅक्मयुम जर काम करत नसेल तर संबंधित कार चालकाला ब्रेक दाबताना अतिरिक्त दाब द्यावा लागतो आहे, असे आढळून आलेले आहे. असा दोष असलेल्या गाडय़ाच कंपनीने परत मागवल्या आहेत.
याआधी कंपनीने 24 जानेवारी रोजी ग्रँड विटाराच्या जवळपास 11000 हून अधिक गाडय़ा परत मागवल्या होत्या. त्या 8 ऑगस्ट 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये तयार करण्यात आल्या होत्या.









