महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड : चुरस वाढणार
बेळगाव ; यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून मारुती तिप्पाण्णा नाईक यांची निवड करण्यात आली आहे. बेळगाव तालुका म. ए. समितीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात शुक्रवारी निवड समितीची बैठक झाली. त्यामध्ये ही निवड करण्यात आली. यावेळी म. ए. समितीचे नेते अॅड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका म. ए. समितीचे चिटणीस अॅड. एम. जी. पाटील, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी, दीपक पावशे, मनोहर पाटील, सूरज कणबरकर, नारायण सांगावकर आदी उपस्थित होते. यावेळी मारुती नाईक यांची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी त्यांचा सत्कारदेखील करण्यात आला. एकूणच आता यमकनमर्डी मतदारसंघामध्येही चुरस वाढली आहे.









