वर्षाला एक लाख युनिटने क्षमतेत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या मनेसर प्रकल्पाची उत्पादन क्षमता वर्षाला एक लाख युनिटने वाढवली आहे. ऑटोमोटिव्ह कंपनीने सध्याच्या प्लांट-ए मध्ये वाहन ‘असेंबली लाइन’ जोडली आहे. ती हरियाणातील मनेसर येथे कार्यरत असलेल्या तीन उत्पादन संयंत्रांपैकी एक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
मारुती सुझुकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन वाहन ‘असेंबली लाईन’ मध्ये प्रतिवर्षी एक लाख युनिट्स तयार करण्याची क्षमता आहे. निवेदनानुसार, अतिरिक्त ‘असेंबली लाइन’सह, मनेसर येथील एकूण उत्पादन क्षमता नऊपर्यंत पोहोचेल.
हिसाशी ताकेउची, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (मारुती सुझुकी सीईओ), एमएसआय, म्हणाले, ‘आम्ही पुढील सात-आठ वर्षांत आमची क्षमता जवळजवळ दुप्पट करून दरवर्षी 40 लाख वाहनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रतिवर्षी एक लाख वाहन क्षमता वाढ हे उद्दिष्ट आहे.









