नवी दिल्ली :
मारुती सुझुकीने आपल्या प्रीमियम स्मार्ट हायब्रीड एसयूव्ही ग्रँड विटाराचे डोमिनियन आवृत्तीचे भारतीय बाजारात सादरीकरण केले आहे. कारचे स्पेशल एडिशन अल्फा, जेट्टा आणि डेल्टा प्रकारांवर आधारित आहे. हे विविध प्रकारांवर 52,699 रुपयांपर्यंत मोफत अॅक्सेसरीज देत आहे. कंपनीचा दावा आहे की प्रीमियम स्मार्ट हायब्रिड कार 27.97 केएमपीएल मायलेज देते. अॅक्सेसरीज पॅकेज जोडूनही कंपनीने कारच्या किमतीत वाढ केलेली नाही. याची किंमत 10.99 लाख ते 20.99 लाख रुपये (एक्स-शोरूम, संपूर्ण भारत) दरम्यान आहे. त्याची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टास, टोयोटा हॅरियर, स्कोडा, टाटा क्रर्व यांच्यासोबत स्पर्धा राहणार आहे.









