वृत्तसंस्था / श्रीनगर
रियासी येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेला बस चालक विजय कुमार यांची पत्नी रेणू वर्मा हिला जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सरकारी नोकरी प्रदान केली आहे. या नोकरीचे नियुक्तीपत्र त्यांनी रेणू वर्मा यांना राजभवनात दिले. या कार्यक्रमानंतर दिलेल्या संदेशात त्यांनी या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली असून जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असा निर्धार व्यक्त केला. 9 जूनला जम्मूहून शिवखोडी येथे चाललेल्या बसवर 2 दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. विजयकुमार यांनाही गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर ही बस दरीत कोसळून 9 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.









