वृत्तसंस्था / सोल
दक्षिण कोरियाच्या सरकारने देशात आपत्कालीन मार्शल लॉ लागू केला आहे. त्या देशाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. दक्षिण कोरियातील विरोधी पक्ष देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे हे कठोर पाऊल उचलावे लागत आहे, असे येओल यांनी ही घोषणा करताना स्पष्ट केले आहे.









