समाज नियमांच्या अनुसार अनेक नाती ‘पवित्र’ मानण्याची प्रथा आहे. पवित्र याचा अर्थ असा की या नात्यांमध्ये विवाह किंवा शरीसंबंध प्रस्थापित करणे निषिद्ध असते. सख्खी भावंडे, माता आणि पुत्र, पिता आणि कन्या आदी जवळच्या नात्यांमध्ये विवाह संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. असे संबंध केवळ सामाजिक कारणांच्यासाठी नव्हे, तर वैज्ञानिकदृष्ट्याही निषिद्ध मानले जातात.
तथापि, प्रत्येक नियमाला अपवाद असतातच. काही व्यक्ती समाजाचे हे नियम मोडून विवाहसंबंध किंवा शरीरसंबंध प्रस्थापित करतात. समाज त्यांची छी थू करतो, तरी ते बधत नाहीत. आपला हेका ते चालवितात. त्यांचे असे संबंध समाजाच्या चर्चेचा भाग बनतात. अशा संबंधांवर चवीने चर्चा केली जाते पण बहुतेकजण स्वत: त्यांचे अनुकरण करीत नाहीत. सख्ख्या बहिणीशी शरीरसंबंध किंवा विवाह, काकाचे पुतणीवर अत्याचार किंवा मामा-भाची यांच्यात संबंध अशी वृत्ते आपल्याला वाचावयास मिळत असतात. आपण त्यांचा निषेधही करतो.
सध्या असा एक व्हिडीओ फिरत आहे. त्यात एक चोवीस वर्षांची युवती 50 वर्षाच्या एका माणसाची ओळख आपला पिता अशी करुन देत आहे. तसेच आपण त्याच्याशी विवाह केला आहे, असेही तिचे म्हणणे आहे. तिचा पिताही याला दुजोरा देताना दिसत आहे. या व्यक्ती कोणत्या भागातील आहेत हे या व्हिडीओवरुन समजू शकत नाही. तथापि, हे जोडपे भारतीय असावे, असे त्यांचे चेहरे आणि वेषभूषा यावरुन वाटते. सध्या या व्हिडीओची बरीच चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या या निर्लज्जपणावर सडकून टीका केली आहे. तर काही जणांनी हा व्हिडीओ विश्वसनीय नसल्याचे मत व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.









