सांगली : मॉर्निंग वॉकला गेलेल्या सौ. राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत (वय २९, रा. कोळीमळा, इस्लामपूर या विहिरीत पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवार दि. १८ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कौस्तुभ सरनोबत आणि त्यांची पत्नी राजनंदिनी हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. दरम्यान राजनंदिनी या लघुशंकेसाठी गेल्या असता कापूसखेड गावच्या हद्दीतील संदीप पाटील व विनायक पाटील यांच्या सामाईक विहिरीमध्ये पाय घसरून पडल्या. याबाबतची वर्दी कौस्तुभ सरनोबत यांनी दिली आहे. अधिक तपास स. पो. नि. साळुंखे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








