अत्यंत हैराण करणारे आहे कारण
जेव्हा दोन व्यक्ती विवाहबंधनात अडकतात, तेव्हा परस्परांसोबत पूर्ण आयुष्य व्यतित करण्याची शपथ घेत असतात. परंतु जगात एका ठिकाणी विवाह केवळ काही तासांसाठी होत असतो. चीनच्या काही भागांमध्ये पुरुष केवळ 24 तासांसाठी विवाह करतात.
चीनमध्ये गरीबीमुळे लोक विवाहादरम्यान युवतीला भेटवस्तू आणि पैसे देऊ शकत नाहीत, यामुळे त्यांचा विवाह होत नाहच. याचमुळे तेथे एक अनोखा विवाह केला जातो. यामुळे तेथील पुरुषांना केवळ विवाहित म्हणवून घेण्याची संधी मिळत असते.

चीनच्या हुबेई प्रांतात विशेषकरून ग्रामीण भागांमध्ये 24 तासांचा म्हणजेच एका दिवसाचा विवाह होत असतो. येथील पुरुषांचा गरीबीमुळे विवाह होत नाही, यामुळे ते मृत्यू येण्यापूर्वी केवळ नावापुरता विवाह करतात. मागील 6 वर्षांमध्ये हा प्रकार तेथे वाढला आहे. या प्रांतात अशाप्रकारचे विवाह करण्यासाठी अनेक महिला तयार असतात. या विवाहाकरता या महिला 40 हजार रुपये आकारत असतात. पैशांची गरज असलेल्या महिला अशा विवाहासाठी तयार होतात.
माणसाला मृत्यूनंतर फॅमिली ग्रेवयार्डमध्ये विवाहित असेल तरच दफन केले जावे असे हुबेईच्या ग्रामीण क्षेत्रात मानले जाते. याचमुळे गरीब पुरुष विवाहानंतर स्वत:च्या वधूला फॅमिली ग्रेवयार्डमध्ये घेऊन जातात, तेथे पूर्वजांच्या कब्रसमोर ते आपला विवाह झाल्याची घोषणा करतात. ही कृती केल्यावर संबंधित व्यक्तीला भविष्याकरता फॅमिली ग्रेवयार्डमधील स्थान निश्चित होते.









