विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे, अशी मान्यता बहुतेक सर्व समाजांमध्ये आहे. विवाह हे सात जन्मांचे बंधन असते, अशीही समजूत आहे. साहजिकच, विवाहाला मानवाच्या जीवनात सर्वाधिक महत्व असून त्याशिवाय जगण्याला पूर्णत्व येत नाही, असे मानले जाते. विवाह प्रेमातून झालेला असो, पेंवा तो ठरवून झालेला असो, तो होणे आवश्यक आहे, असे बहुतेकांचे मत असतेच.
पण, एखाद्या व्यक्तीने भुताशी विवाह केल्याचा दावा केला तर तो खरा मानला जाईल काय ? शक्यता जरा कमी आहे. कारण भूत हा प्रकार अस्तित्वातच नसतो. त्यामुळे त्याच्याशी विवाह करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठासून सांगितले जाते. तथापि, ब्रोकर्डे नामक एका महिलेने असा दावा केला आहे. आपण भुताशी विवाह केला होता. तथापि, ते फारच त्रास द्यायला लागले. त्यामुळे नंतर त्याच्याशी घटस्फोट घेणे भाग पडले, असेही ही महिला सांगते.
पाच महिन्यांपूर्वी हॅलोविन नामक मृतात्म्याशी आपण आपण विवाह केला होता, असा या महिलेचा दावा आहे. या भुताशी आपली ओळख लंडनाच्या एका स्मशानभूमीत झाली. त्याच्याशी विवाह करावा असे आपल्याला वाटले. त्यानेही मान्यता दिली. त्यामुळे आम्ही विवाह केला. पुढे त्याने आपल्याला ‘नरका’त नेण्याचा प्रयत्न केला. तसेच आपला पती आपल्याला रात्रंाr-बेरात्री भेटू लागला. याचा त्रास असह्या होऊन मी त्याला घसस्फोटही त्याच स्मशानभूमीत दिला, असे ही महिला सांगते. मात्र, ती मनोरुग्ण असावी आणि तिला हे भास होत असावेत, असे अनेक मानसोपचार तज्ञांचे मत आहे. या महिलेची आता चौकशी केली जात असून तिच्या या विवाहाच्या आणि घटस्फोटाच्या कथेचे सत्य पडताळण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तिचा हा दावा सोशल मिडियावर भलताच लोकप्रिय झाला असून लोक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.









