बेळगाव – ग्रामवास्तव्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्याला दाखल झालेले बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी थेट आज उगरगोळ येथील ब्रँडी शॉपमध्ये एन्ट्री मारली आणि गुणवत्ता तपासले. बसवेश्वर चौक, उगरगोळ येथील ब्रॅंडीशोपला भेट देऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी परवाना, दारू साथ आणि गुणवत्तेची तपासणी केली आणि दुकाने बंद पाडली. काही दारूचे बाटल्या घेऊन अबकारी विभागाच्या अधिकाऱ्याना त्याची तपासणी करून अहवाल सादर करायला निर्देश दिले. या आधी गावातील महिलावर्गानी जिल्हाधिकाऱ्याकडे गावातील दारू दुकाने बंद करण्याची मागणी केली होती.
Previous Articleकिल्ल्यांच्या जतनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही
Next Article शेवटी सावरकरांचाच विजय होणार : सात्यकी सावरकर