शेअर बाजारात उत्साह : ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजार मजबूत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अस्थिरता असूनही दुपारनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही भक्कम स्थितीत राहिले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या वाहनांवरील कर एक महिन्यासाठी पुढे ढकलल्यामुळे जागतिक बाजारात तेजीचा कल राहिला. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 609.86 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.83 टक्क्यांसह 74,340.09 वर बंद झाला. तसेच, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 207.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 22,544.70 वर बंद झाला. विविध कंपन्यांची कामगिरी पाहता एशियन पेंटस 5 टक्क्यांनी वाढून बंद झाला. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, सनफार्मा, अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, टायटन, टीसीएस, बजाज फायनान्स आणि एचसीएल टेक हे प्रमुख समभाग वधारले. दुसरीकडे, टेक महिंद्राचे समभाग 2 टक्क्यांपेक्षा अधिक घसरले. याशिवाय, कोटक बँक, झोमॅटो, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स आणि एसबीआयचे समभाग घसरणीसह बंद झाले.
तेजीची कारणे?
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या ऑटोमोबाईल्सवरील टॅरिफ एका महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचा लाभ भारतीय बाजाराला झाला.
- मागणी कमी झाल्यामुळे आणि चीनकडून पुढील आर्थिक प्रोत्साहन पॅकेजमुळे कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. यामुळे ऊर्जा आणि धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.
- बँकिंगसह अन्य समभागांमधील मजबूतीमुळे स्थितीत सुधारणा झाल्याने बाजाराला बळ मिळाले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एशियन पेंटस् 267
- कोल इंडिया 382
- हिंडाल्को 681
- बीपीसीएल 265
- एनटीपीसी 337
- टाटा स्टील 150
- सिप्ला 1461
- रिलायन्स 1309
- बजाज फिनसर्व्ह 1845
- एचयुएल 2218
- आयशर मोटर्स 5094
- अदानी पोर्टस् 1136
- श्रीराम फायनान्स 644
- सनफार्मा 1614
- अॅक्सिस बँक 1034
- हिरो मोटोकॉर्प 3648
- ओएनजीसी 232
- टीसीएस 3601
- बजाज फायनान्स 8410
- डॉ. रे•िज लॅब्ज 1140
- टायटन 3121
- अपोलो हॉस्पिटल 6274
- पॉवरग्रिड कॉर्प 266
- जेएसडब्ल्यू स्टील 1011
- एचसीएल टेक 1585
- लार्सन टुब्रो 3259
- महिंद्रा-महिंद्रा 2742
- बजाज ऑटो 7462
- भारती एअरटेल 1626
- मारुती सुझुकी 11666
- विप्रो 285
- अल्ट्राटेक सिमेंट 10493
- इन्फोसिस 1715
- एसबीआय 732
- नेस्ले 2201
- आयटीसी 405
- टाटा कन्झ्यु. 958
- ग्रासिम 2393
- एचडीएफसी बँक 1691
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा 1503
- ट्रेंट 5069
- कोटक महिंद्रा 1921









