सेन्सेक्स 304 अंकांनी तेजीत : जागतिक बाजार मजबूत
मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार बुधवारी तेजीसमवेत बंद होण्यात यशस्वी झाला. धातू आणि फार्मा कंपन्यांच्या समभागांनी शेअर बाजाराला मजबुती प्रदान करण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 304 अंकांनी वाढत 80539 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 131 अंकांनी वाढत 24,619 अंकांवर बंद झाला. याचप्रमाणे निफ्टी बँक निर्देशांक 137 अंकांनी वाढत 55,181 च्या स्तरावर बंद झाला. बुधवारी डिफेन्स समभागांमध्ये पुन्हा खरेदी पाहायला मिळाली. फार्मा, ऑटो आणि धातू निर्देशांकाच्या दमदार कामगिरीचा फायदा शेअर बाजाराला उठवता आला.
निफ्टीमध्ये पाहता अपोलो हॉस्पिटल 7 टक्के, हिंडाल्को 5 टक्के, डॉक्टर रे•ाrज लॅब्ज 2.7 टक्के, हिरो मोटोकॉर्प 2.6 टक्के आणि सिप्ला 2.5 टक्के इतके वाढले होते. सेन्सेक्समध्ये पाहता इटर्नल 2.11 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.47 टक्के, पॉवरग्रिड कॉर्प 1.42 टक्के, महिंद्रा आणि महिंद्रा 1.41 टक्के आणि टाटा मोटर्स 1.48 टक्के इतके तेजीसमवेत बंद झाले.
सेन्सेक्समध्ये घसरणीत राहणाऱ्या समभागांमध्ये इंडसइंड बँक, अदानी पोर्ट, टायटन, आयटीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचा समावेश होता. सकाळी सेन्सेक्स 200 अंकांनी वाढत 80492 च्या स्तरावर खुला झाला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकसुद्धा मजबुतीसोबत 24,586 अंकांवर खुला झाला. सेन्सेक्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील आणि रिलायन्स यांचे समभागसुद्धा वाढत बंद झाले. यासोबत टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, मारुती सुझुकी हे समभाग घसरणीत पाहायला मिळाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.63 टक्के इतका वाढत व्यवहार करत होता तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 0.65 टक्के वाढत व्यवहार करत होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- भारत इले. 388
- इटर्नल 312
- कोटक महिंद्रा 1989
- टाटा मोटर्स 663
- महिंद्रा-महिंद्रा 3282
- पॉवरग्रिड कॉर्प 288
- भारती एअरटेल 1871
- सनफार्मा 1639
- बजाज फायनान्स 860
- एशियन पेन्ट्स 2500
- ट्रेन्ट 3595
- एचडीएफसी बँक 1979
- हिंदुस्थान युनिलिव्हर 2494
- बजाज फिनसर्व्ह 1913
- स्टेट बँक 822
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3692
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1382
- इन्फोसिस 1426
- मारुती सुझुकी 12849
- एचसीएल टेक 1500
- अपोलो हॉस्पिटल 7808
- हिंडाल्को 700
- हिरोमोटो 4765
- टीव्हीएस मोटार 3019
- वेदान्ता 438
- जिओ फायानान्स 330
- कमिन्स 3792
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अदानी पोर्ट 1319
- आयटीसी 414
- अल्ट्राटेक सिमेंट 12396
- टायटन 3474
- अॅक्सिस बँक 1066
- आयसीआयसीआय 1421
- एनटीपीसी 339
- टाटा स्टील 160
- सुझलॉन एनर्जी 60
- कोलगेट 2173
- अंबुजा सिमेंट 580
- कॅनरा बँक 108
- बँक ऑफ बडोदा 242
- बीपीसीएल 322
- श्री सिमेंट 30370









