फेडच्या निर्णया अगोदरच बाजारात गुंतवणूकदारांची सावध भूमिका : आयटीचे समभाग प्रभावीत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी विक्रमी कामगिरी केली. त्यानंतर मात्र प्राप्त केलेली तेजी गमवात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक बंद झाले आहेत. यामध्ये फेडरल रिझर्व्ह बँक यांच्याकडून व्याजदर कपात करण्याचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. म्हणून गुंतवणूकदार बाळगून राहिले असल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत आपला प्रवास सुरु केल्याचे चित्र राहिले. वरील कारणास्तव भारतीय बाजारात नफा वसुली झाल्याने आयटी क्षेत्रातील समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 131.43 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.16 टक्क्यांनी घसरणीसह 82,948.23 वर बंद झाला. दिवसभरातील कामगिरीदरम्यान 246.72 अंकांसोबत निर्देशांक 83,326.38 चा नवा विक्रम प्राप्त करण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 41.00 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 25,377.55 वर बंद झाला. दरम्यान निफ्टी इंट्रा डे मध्ये 63.65 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 25,482.20 चा नवा विक्रम नोंदवला.
मुख्य कंपन्यांच्यामध्ये निफ्टीमधील 50 कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक , टेक महिंद्रा आणि विप्रोसह 33 समभाग प्रभावीत राहिले. यांचे निर्देशांक हे 3.50 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी बँकेसह निफ्टीमधील 19 कंपन्यांचे समभाग हे बुधवारी 4.22 टक्क्यांनी वधारले आहेत.
बीएसई सेक्सेक्समधील 19 समभागांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि सनफार्मा 3.46 टक्क्यांनी नुकसानीसह बंद झाले. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी बँक 3.36 टक्क्यांनी वधारले आहेत.
जागतिक स्थिती :
जागतिक बाजारांमध्ये आशियातील बाजारात टोकीओ आणि शांघाय हे वधारले आहेत. तर हाँगकाँगमधील राष्ट्रीय अवकाशाच्या कारणास्तव बाजार बंद होते. युरोपीयन बाजार घसरणीत राहिले होते. मंगळवारी अमेरिकन बाजारात मिळताजुळता कल राहिला होता. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.63 टक्क्यांनी घसरुन 72.50 डॉलर प्रति बॅरेल राहिले होते.









