सेन्सेक्स 236 तर निफ्टी 93 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांच्या निर्देशांकांमध्ये चढउताराची स्थिती राहिली होती. या अगोदरच्या दिवशी बुधवारीही बाजारात दबाव सदृश्य वातावरण राहिल्याचे दिसून आले होते. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी दिवसअखेर सेन्सेक्स 236.18 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 81,289.96 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 93.10 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 24,548.70 वर बंद झाला आहे.
दिवसभराच्या कामगिरीत सकारात्मक बाब म्हणजे आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये चमक राहिली. तसेच निफ्टीमधील 50 समभागांपैकी अदानी एंटरप्राईजेसचे समभाग हे 1.97 टक्क्यांनी वधारुन 2,504 च्या पातळीवर बंद झाला. तर भारती एअरटेल 1.44 टक्क्यांनी मजबूत, टेक महिंद्रा 1.53 टक्के, इंडसइंड बँक 1.34 टक्के तर अदानी पोर्ट 0.83 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये मात्र सर्वाधिक घसरणीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये एनटीपीसी 2.71 टक्क्यांनी प्रभावीत राहिले. यात हिरोमोटो 2 टक्के, कोल इंडिया 1.89 टक्के व बीपीसीएलचे समभाग 1.73 टक्क्यांसोबत घसरणीत राहिले.
आशिया बाजारात तेजीचा कल
आशिया बाजारातील कामगिरीत गुरुवारी जपानचा निक्केई 1.21 टक्के आणि कोरियाचा कोस्पी बाजार 1.62 टक्क्यांनी तेजीत राहिला. तर चीनचा शांघाय कम्पोजिट निर्देशांक 0.85 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. उपब्लध आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी 1,012 कोटींचे समभाग विकले आहेत. दरम्यान देशातील गुंतवणूकदारांनीही 2,007 कोटी समभाग खरेदी केल्याची माहिती आहे. भारतीय बाजारात आज आठवड्यातील अंतिम सत्र राहणार आहे. त्यामुळे आज तेजीचा कल राहणार का? बाजारात प्रभावीत होत बंद होणार हे पहावे लागणार असल्याचे शेअर बाजारातील अभ्यासकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा 1789
- भारती एअरटेल 1610
- इंडसइंड बँक 997
- इन्फोसिस 1986
- अदानी पोर्ट 1244
- जेएसडब्लू स्टील 1003
- टीसीएस 4456
- पॉवरग्रिड कॉर्प 329
- एचसीएल टेक 1935
- टाटा स्टील 150
- बजाज फायनान्स 7123
- आयसीआयसीआय 1328
- मॅक्स हेल्थकेअर 1168
- आयशर मोटर्स 4812
- कमिन्स 3607
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एनटीपीसी 355
- हिंदुस्थान युनि 2344
- टाटा मोटर्स 786
- कोटक महिंद्रा 1777
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3866
- एशियन पेन्ट्स 2388
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1263
- मारुती सुझुकी 11123
- आयटीसी 460
- स्टेट बँक 853
- नेस्ले 2224
- टायटन 3446
- सनफार्मा 1803
- बजाज फिनसर्व्ह 1679
- एचडीएफसी बँक 1858
- अॅक्सिस बँक 1145
- अल्ट्राटेक सिमेंट 11804
- महिंद्रा&महिंद्रा 3068
- कोल इंडिया 408
- आयआरसीटीसी 839
- बीपीसीएल 302
- एसआरएफ 2296
- कोलगेट 2843
- ल्यूपिन 2147
- एसबीआय लाईफ 1435
- कॅनरा बँक 107









