सेन्सेक्स 505 अंकानी प्रभावीत : अदानी पोर्ट्स सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये सेन्सेक्स तब्बल 505 अंकांनी प्रभावीत झाला आहे. अशी स्थिती निर्माण होण्यास जागतिक पातळीवरील घडामोडींचा प्रभाव कारणीभूत ठरला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 505.19 अंकांनी कोसळून निर्देशांक 65,280.45 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अंतिम सत्रात 165.50 अंकांनी घसरुन निर्देशांक 19,351.80 वर बंद झाला आहे. यावेळी मुख्य कंपन्यांमध्ये झीलचे समभाग सर्वाधिक 9 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. निफ्टीत अदानी पोर्ट्समध्ये सर्वाधिक तीन टक्क्यांनी घसरले आहेत.
सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले असून यासोबतच इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, एशियन पेन्ट्स, कोटक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग 1 टक्क्यांनी घसरुन बंद झाले. याच्या व्यतिरिक्त टाटा स्टील, आयटीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभागही प्रभावीत झाले आहेत.
या समभागात फक्त तेजी
सेन्सेक्समध्ये टाटा मोर्ट्सचे समभाग सर्वाधिक 2.94 टक्क्यांनी वधारले आहेत. याप्रमाणेच टायटन 1.06 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 0.98 टक्के आणि स्टेट बँक यांचे समभाग 0.24 टक्क्यांनी वधारले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीसोबत मुख्य क्षेत्रांमधील कामगिरीचा परिणामही शेअर बाजारात झाला आहे. यात वाहन आणि पीएसयू बँक वगळता अन्य सर्व क्षेत्रे नुकसानीत राहिली होती. तसेच एफएमसीजी, ऊर्जा, रियल इस्टेट आदी क्षेत्रात 1 टक्क्यांची घसरण राहिली आहे. बीएसई मिडकॅप 0.8 टक्क्यांनी नुकसानीत राहिले तर स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.2 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे.









