सेन्सेक्स 191 अंकांनी नुकसानीत , इंडसइंड नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार काहीसा कमकुवत होत बंद झालेला दिसून आला. सेन्सेक्स 191 अंकांनी घसरणीत राहिला होता. शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 191 अंकांनी घसरुन 77414 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 72 अंकांनी घसरत 23519 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 11 समभागांमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर 19 समभाग मात्र घसरणीसोबत बंद झाले होते. यात इंडसइंड बँक यांचे समभाग सर्वाधिक 3.5 टक्के इतके घसरत बंद झाले. सोबत कोटक महिंद्रा बँक, एचयुएल आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग सुद्धा 1 टक्का इतके घसरलेले दिसले. निफ्टीतील कामगिरी पाहता 50 समभागांपैकी 19 समभाग हे तेजीत होते तर उर्वरीत 31 समभागांची कामगिरी मात्र नकारात्मक राहिली होती.
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकामध्ये मीडियाचा निर्देशांक 2.29 टक्के इतका सर्वाधिक नुकसानीत होता. आयटी निर्देशांक 1.76 टक्के आणि रियल्टी निर्देशांक 1.42 टक्के इतका घसरलेला होता. एफएमसीजी आणि प्रायव्हेट बँकांचा निर्देशांक मात्र दुसरीकडे तेजीसोबत बंद झाला होता. आशियाई बाजारात पाहता जपानचा निक्केई 1.80 टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग 0.65 आणि चीनचा शांघाय कंपोझीट 0.67 टक्के इतका घसरलेला दिसला. 27 मार्च रोजी अमेरिकेतील डो जोन्स निर्देशांक 0.37 टक्के घसरत बंद झाला होता. नॅसडॅक कंपोझीटसुद्धा नुकसानीसह 0.53 टक्के घसरत बंद झाला. एस अँड पी 500 निर्देशांकही 0.33 टक्के घसरला होता. 27 रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी 11,111.25 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही जवळपास 2517.70 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते. मार्चमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 6367 कोटोंचे समभाग खरेदी केले.









