सेन्सेक्स 780 अंकांनी होता वाढला : रिलायन्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भांडवल मूल्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 74573 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढले होते. मागच्या आठवड्यात दसरा व गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजार गुरुवारी बंद होता.
मागच्या आठवड्यात सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य एकंदरीत 74573.63 कोटी रुपयांनी वाढले होते. मागच्या आठवड्यात चार दिवसांच्या कामकाजामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 780 अंकांनी वाढला होता तर निफ्टी जवळपास 239 अंकांनी वाढत बंद झाला होता. यात पाहता एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या बाजार भांडवलामध्ये वाढ झालेली दिसून आली तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि इन्फोसिस यांच्या बाजार भांडवलामध्ये घसरण झालेली दिसून आली.
यांच्या मूल्यात झाली वाढ
एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यात 30106 कोटी रुपयांनी वाढत 1481889 कोटी रुपयांवर तर एलआयसीचे 20587 कोटी रुपयांनी वाढत 572507 कोटी रुपयांवर पोहोचले. याचप्रमाणे स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 9276 कोटी रुपयांनी वाढत 800340 कोटी रुपयांवर आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवलमूल्य 7859 कोटींच्या वाढीसह 597806 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 3108 कोटी रुपयांनी वाढत 975115 कोटी रुपयांवर तर बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 2893 कोटी रुपयांनी वाढत 615808 कोटी रुपयांवर पोहोचले.
यांच्या मूल्यात घसरण
रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल मूल्य मात्र 19351 कोटी रुपयांनी कमी होत 18,45084 कोटी रुपयांवर घसरले होते. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजारमूल्य मात्र 12031 कोटी रुपयांनी कमी झाले होते.









