सेन्सेक्स 94 अंकांनी तेजीत : निफ्टी प्रभावीत होत बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी नफावसुलीच्या दबावामध्ये सुरुवात झाली आहे. यामध्ये सेन्सेक्स 94 अंकांनी तेजीत तर निफ्टी 3.15 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. विविध कंपन्यांमध्ये टीसीएस 3 टक्क्यांनी तेजीत तसेच एनटीपीसीचे समभाग 3 टक्क्यांनी नुकसानीत राहिल्याची नोंद केली आहे
दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 94.05 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.14 टक्क्यांसोबत 67,221.13 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला 3.15 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.02 टक्क्यांसोबत 19,993.20 वर बंद झाला आहे. याच दरम्यान टीसीएसचे समभाग तीन टक्क्यांनी वधारले आहेत. तर एनटीपीसीचे समभाग तीन टक्क्यांनी नुकसीसोबत बंद झाले आहेत.
या क्षेत्रांची कामगिरी
मंगळवारच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान वगळता अन्य सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत राहिले आहेत. तर वाहन, कॅपिटल गुड्स, ऊर्जा, ऑईल अॅण्ड गॅस, धातू आणि रियल इस्टेट यांचे निर्देशांक 1 ते 3 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यावेळी मिडकॅपचा निर्देशांक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिला. तर स्मॉलकॅपचा निर्देशांक चार टक्क्यांनी प्रभावीत होता. मुख्य कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्समध्ये टीसीएसचे समभाग सर्वाधिक 2.91 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच लार्सन अॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया यांचे समभाग 1 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, सनफार्मा, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
दुसरीकडे सेन्सेक्समधील पॉवरग्रिडचे समभाग हे 3.48 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून यावेळी टाटा मोर्ट्स, टाटा स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज. हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक यांचे समभाग 1 टक्क्यांनी घसरुन बंद झाले.









