सेन्सेक्स 311 तर निफ्टी 98 अंकांनी वधारले : कोटक महिंद्राचे समभाग तेजीत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी तेजीचा कल राहिल्याचे दिसून आले. यामध्ये वाहन, बँकिंग, धातू आणि ऑईल व गॅस यांच्या समभागातील लिलावामुळे बाजारात तेजीची नेंद केली आहे. प्रमुख समभागातील कामगिरीने सेन्सेक्स दिवसअखेर 311 अंकांची तेजी प्राप्त करत बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रात दिवसअखेर 311.21 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,157.72 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 98.25 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 17,722.30 वर बंद झाल्याची नोंद केली आहे. निफ्टीमधील कोटक महिंद्रा बँकेचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 4.62 अंकांनी वधारुन बंद झाले आहेत. प्रमुख कंपन्यांपैकी मंगळवारी कोटक महिंद्रा बँकेचे समभाग हे सर्वाधिक 5.04 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. यासोबतच टाटा स्टील 2.43 टक्के आणि आयटीसी 1.90 टक्के यासोबतच आयसीआयसीआय, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा , स्टेट बँक आणि पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱ्या बाजूला सेन्सेक्समध्ये टीसीएस 1.50 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. यासोबतच इन्फोसिस 1.42 टक्क्यांनी बंद झाला. एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एशियन पेन्ट्स आणि विप्रो यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.
बाजाराची नजर तिमाही अहवालांवर
चालू आठवड्यात विविध कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर होणार असल्याचे संकेत आहेत. यामुळेच बाजारात बँकिंग व वाहन क्षेत्रात सर्वाधिक लिलाव राहिला होता. यासोबतच बुधवारी किरकोळ महागाई दराचे आकडे सादर होणार आहेत. तसेच आरबीआयचे 6 टक्क्यांच्या वरती टॉलरेन्स पातळीच्यावर जाण्याचे संकेत आहेत. यामुळे या सर्व घडामोडींचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर राहणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसह अन्य शेअर बाजारातील ट्रेडिंग करणाऱ्यांनी बाजारातील कामगिरीवर लक्ष ठेवून राहावे लागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.









