आरबीआयच्या निर्णयापूर्वी गुंतवणूदार दबावात : सेन्सेक्स 213 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील बुधवार आणि गुरुवारच्या सत्रात दोन्ही दिवस आरबीआयच्या पतधोरण बैठकीच्या पार्श्वभूमीवर काहीसा दबाव निर्माण झाला आहे. गुंतवणूकदारांनी सवाध भूमिक घेतल्याचे दिसून आले आहे. यामुळे गुरुवारचे सत्र 213 अंकांनी प्रभावीत झाले आहे. यामुळे आज होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरण बैठकीच्या निर्णयावर बाजाराची दिशा निश्चित होणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे जागतिक बाजारपेठेतील संमिश्र भावनांमुळे गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले. डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी असल्याने देशांतर्गत कंपन्यांच्या भावनेवर नकारात्मक परिणाम झाला.
दिग्गज कंपन्यांपैकी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 213 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.27 टक्क्यांनी घसरून 78,058.16 वर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 92.95 अंकांच्या नुकसानीतसोबत निर्देशांक -0.39 टक्क्यांनी घसरून 23,603 वर बंद झाला. मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील भारती एअरटेल, टायटन, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स हे प्रमुख घसरणीचे भागीदार राहिले आहेत. अन्य कंपन्यांममध्ये मात्र अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँकेचे समभाग वधारून बंद झाले.
बाजारातील ठळक बाबी…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने रेपो रेटवरील निर्णय घेण्याच्या एक दिवस आधी, व्याजदराशी संबंधित ऑटो आणि ग्राहक समभागांमुळे शेअर बाजार घसरला. देशांतर्गत कंपन्यांच्या डिसेंबर तिमाही निकालांपेक्षा अपेक्षेपेक्षा कमकुवत निकालांचा बाजाराच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला.
गुंतवणूकदारांचे आरबीआय निर्णयावर लक्ष
गुंतवणूकदारांचे लक्ष आरबीआयच्या व्याजदरांवरील निर्णयावर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ची चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) बैठक बुधवार 5 फेब्रुवारी रोजी सुरू झाली. बैठकीचा निकाल आज शुक्रवारी 7 फेब्रुवारी जाहीर केले जाणार आहेत. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, ‘बेंचमार्क निर्देशांकांमध्ये थोडीशी घसरण झाली. व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार व्याजदरांमध्ये संभाव्य कपातीबाबत आरबीआयच्या निर्णयाची वाट पाहत होते. मंदावलेल्या वाढीला चालना देण्यासाठी वापर वाढवण्यावर सरकारचे लक्ष असूनही व्यापक बाजार सावध आणि एकत्रीकरणाच्या टप्प्यात आहे.’ परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीची मालिका सतत सुरू आहे. 2025 मध्ये आतापर्यंत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) देशांतर्गत बाजारातून 9.23 अब्ज डॉलर किमतीच्या इक्विटी विकल्या आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- अदानी पोर्ट 1163
- इन्फोसिस 1915
- अॅक्सिस बँक 1020
- एचसीएल टेक 1723
- टेक महिंद्रा 1670
- इंडसइंड बँक 1065
- एचडीएफसी बँक 1744
- आयसीआसीआय 1272
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1281
- कोटक महिंद्रा 1917
- सिप्ला 1470
- कमिन्स 2960
- ब्रिटानिया 4972
- बीपीसीएल 262
समभाग घसरलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल 1619
- टायटन 3410
- एनटीपीसी 312
- स्टेट बँक 752
- आयटीसी 441
- टाटा स्टील 132
- पॉवरग्रिड कॉर्प 281
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3139
- टाटा मोटर्स 709
- अल्ट्राटेक सिमेंट 11485
- झोमॅटो 229
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3352
- हिंदुस्थान युनि 2373
- सनफार्मा 1745
- एशियन पेन्ट्स 2263
- बजाज फिनसर्व्ह 1787
- नेस्ले 2243
- टीसीएस 4083
- मारुती सुझुकी 13073
- बजाज फायनान्स 8507
- मॅक्स हेल्थकेअर 1131
- भारत इलेक्ट्रीक 279
- एसआरएफ 2894
- एनटीपीसी 312
- श्री सिमेंट 27851
- ओएनजीसी 256
- अंबुजा सिमेंट 513









