सहा मोटारसायकली जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करून 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मार्केट पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली आहे.
संतोष शिवाप्पा बेविनकोप्प (वय 29) रा. इंचल, ता. सौंदत्ती, अबुबकर सिकंदर सौदी (वय 21) रा. श्रीनगर उद्यानाजवळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या जोडगोळीकडून 3 हिरो होंडा स्प्लेंडर, सीडी डिलक्स, ऍक्टिवा, हिरो मेस्ट्रो अशा एकूण 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.









