सेन्सेक्स 247 अंकांनी प्रभावीत : जागतिक पातळीवर संमिश्र संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांसह संमिश्र ट्रेंड दरम्यान चालू आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.आयटी क्षेत्रातील दबावामुळे बाजारातील वातावरण बिघडल्याचे दिसून आले. अमेरिका-भारत व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स सलग चौथ्या सत्रात घसरल्याचे दिसून आले.
बीएसई सेन्सेक्स 150 अंकांपेक्षा जास्त घसरून उघडला. ट्रेडिंग नंतर अंतिम क्षणी 247.01 अंकांनी घसरून 82,253.46 वर बंद झाला. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी देखील अखेर 67.55 अंकांनी घसरून 25,082.30 वर बंद झाला.
सर्वाधिक नफा आणि तोटा
क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी आयटी 1.1 टक्क्यांनी घसरून सर्वाधिक नुकसानीसह बंद झाला. टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस आणि एलटीआयमाइंडट्री हे घसरणाऱ्या समभागांमध्ये होते. इतर समभागांमध्ये, निफ्टी प्रायव्हेट बँक, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ऑइल अँड गॅस देखील लाल रंगात बंद झाले.
दुसरीकडे, निफ्टी रिअॅल्टी सुमारे 1.4 टक्क्यांनी वाढली. याशिवाय, निफ्टी हेल्थकेअर, मीडिया, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स, पीएसयू बँक, ऑटो, एफएमसीजी, मेटल आणि एनर्जी देखील हिरव्या रंगात बंद झाले.
सेन्सेक्समधील 20 कंपन्यांचे शेअर्स प्रभावीत होत बंद झाले. टेक महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एचसीएल टेक आणि एल अँड टी 1.8 टक्क्यांपर्यंत घसरणीसह सर्वाधिक बंद झाले. तर एटरनल (झोमैटो), टायटन, एम अँड एम, सन फार्मा आणि आयटीसी हे सर्वाधिक नफा मिळवणारे होते.
भारत-अमेरिका व्यापार करार
भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार वरील चर्चेचा आणखी एक टप्पा सुरू होणार आहे. यासाठी भारताच्या वाणिज्य मंत्रालयाचे एक पथक वॉशिंग्टन डीसीला पोहोचले आहे. ही चार दिवसांची चर्चा आजपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होईल आणि गुरुवारपर्यंत सुरू राहील. या काळात, शेती आणि ऑटोमोबाईल्ससारख्या प्रमुख व्यापारविषयक मुद्यांमध्ये दोन्ही देशांमधील मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
ण्जूनमध्ये घाऊक महागाई -0.13 टक्क्यांने घसरली
जून 2025 मध्ये अन्न आणि इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाई 20 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. सोमवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये भारताचा घाऊक महागाई दर वार्षिक आधारावर -0.13 टक्क्यांपर्यंत घसरला. यांचाही बाजारात प्रभाव राहिली.









