- अखेरच्या दिवशी तब्बल 609 जणांची माघार
- आज होणार चिन्ह वाटप
प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Market Committee Election : बाजार समितीच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणार असणार आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी तब्बल 609 जणांनी माघर घेतली आहे. येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. तर बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची गर्दी होती. दोन्ही पॅनेलचे मिळून 36 उमेदवार वगळता अन्य 15 उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात आहेत.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रक्रीया सुरु असून गुरुवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. समितीच्या अठरा जागांसाठी तब्बल 660 अर्ज पात्र ठरले होते. तर माघारीच्या मुदतीतही माघारीसाठी उमेदवार फिरकले नसल्याने प्रशासकीय यंत्रणा तणावाखाली होती. मात्र बुधवारी आणि गुरुवारी प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पॅनेल जाहीर केल्याने बहुतांश उमेदवारांनी गुरुवारी माघार घेतली. माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आज शुक्रवार 21 रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे.









