ट्रम्प धमकीचा परिणाम नाही: आयटी, फार्माने सावरले
वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरीक्त शुल्क आकारण्याच्या धमकीची कोणतीही धास्ती गुरुवारी भारतीय शेअर बाजाराने घेतली नाही. सुरुवातीला दबावात असणारे सेन्सेक्स, निफ्टी अखेर तेजीसोबत बंद झाले आहेत. आयटी, फार्मा आणि ऑटो या निर्देशांकांनी शेअरबाजाराला सावरण्याचे काम केले आहे. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 79 अंकांनी वाढत 80623 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 21 अंकांनी वाढीसोबत 24596 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाला.
शेअरबाजाराची ट्रम्प यांच्या धमकीच्या कारणास्तव सुरुवात घसरणीसोबत झाली होती. बाजारात 300 अंकांपर्यंत घसरण राहिली होती पण अखेरच्या एक तासात पाहता आयटी, ऑटो या निर्देशांकांनी कामगिरी सुधारत शेअरबाजाराला तेजीसोबत बंद करण्यात सहकार्य केल्याचे दिसले. निफ्टी बँक निर्देशांक 110 अंकांनी वाढत 55521 अंकांवर बंद झाला. एचडीएफसी बँक, हिरो मोटोकॉर्प आणि इटर्नल या समभागांनी शेअरबाजाराला अखेरच्या क्षणी सावरण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. रुपया डॉलरच्या तुलनेत 3 पैसे मजबूत होता.
विविध निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास गुरुवारी ऑटो, कमोडिटीज, आयटी, एफएमसीजी, फायनॅन्शीयल्स, मेटल, फार्मा यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले तर सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, ऑइल अँड गॅस, रिअॅल्टी यांचे निर्देशांक घसरणीत बंद झाले. निफ्टी मिडकॅप-50 78 अंकांनी वाढत 16034 वर तर स्मॉलकॅप-100 30 अंकांनी वाढत 17692 च्या स्तरावर बंद झाला होता. आयटी निर्देशांक 300 अंकांनी वाढत 34726 अंकांवर बंद झाला. निफ्टीत हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, इटर्नल आणि मारुती सुझुकी यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते तर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टस्, ग्रासिम, ट्रेंट यांचे समभाग घसरणीत होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा 1483
- एचसीएल टेक 1479
- इटर्नल 301
- अॅक्सिस बँक 1079
- मारुती सुझुकी 12625
- टाटा स्टील 159
- एचडीएफसी बँक 1995
- एशियन पेन्ट्स 2506
- टीसीएस 3047
- अल्ट्राटेक सिमेंट 12287
- आयटीसी 413
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3640
- पॉवरग्रिड कॉर्प 285
- सनफार्मा 1598
- बजाज फायनान्स 878
- इन्फोसिस 1437
- स्टेट बँक 805
- ल्यूपिन 1946
- हिरोमोटो 4659
- कमिन्स 3679
- कोल इंडिया 379
- फेडरल बँक 198
- हॅवेल्स इंडिया 1495
- मॅरिको 717
- अंबुजा सिमेंट 591
- एसबीआय लाईफ 1859
- सिप्ला 1491
- आयशर मोटर्स 5677
- बँक ऑफ बडोदा 241
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अदानी पोर्ट 1345
- टेन्ट 5302
- टाटा मोटर्स 647
- हिंदुस्थान युनि 2515
- एनटीपीसी 330
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3210
- कोटक महिंद्रा 1992
- भारत इले. 387
- आयसीआयसीआय 1440
- भारती एअरटेल 1924
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1390
- बजाज फिनसर्व्ह 1921









