सेन्सेक्स 32 तर निफ्टी 13.85 अंकांनी घसरला : सलग सात सत्र प्रभावीतच
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात व सलगच्या सातव्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक सुरुवातीच्या काळातील तेजी गमावत बाजार बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये जवळपास मागील सातही दिवस बाजारात घसरणीत राहिल्याने गुंतवणूकदारांना 21 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जागतिक पातळीवरील सुरु असलेल्या राजकीय व आर्थिक घडामोडी तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले काही नवीन निर्णय यामुळे भारतीय बाजारासह जागतिक बाजारावर परिणाम होत आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर गुरुवारी 32.11 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 76,138.97 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 13.85 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 23,031.40 वर बंद झाला आहे.
मोदी-ट्रम्प यांच्या बैठकीकडे नजर
गुंतवणूकदारांच्या नजरा या गुरुवारी रात्री होणाऱ्या वॉशिंग्टनमधील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीकडे लागून राहणार आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार यावर आगामी भारतीय बाजाराची दिशा निश्चित होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुख्य कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्राईजेस, अदानी पोटर्स, हिरोमोटो, इन्फोसिस आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे 4.93 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर अन्य कंपन्यांमध्ये सनफार्मा, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि सिप्ला यासारख्या समभागांमध्ये तेजीचे वातावरण राहिले होते.
‘या’ क्षेत्रांची कामगिरी
गुरुवारी विविध क्षेत्रांच्या कामगिरीत आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्या, औषध, धातू आणि खासगी बँक यांचे निर्देशांक हे 1.47 टक्क्यांपर्यंत तेजीत राहिले होते. तर वाहन, आयटी, एफएमसीजी , सरकारी बँक, तेल आणि गॅस या कंपन्यांचे निर्देशांक हे प्रभावीत राहिले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बजाज फिनसर्व्ह 1840
- सनफार्मा 1746
- टाटा स्टील 136
- बजाज फायनान्स 8405
- कोटक महिंद्रा 1971
- झोमॅटो 217
- इंडसइंड बँक 1049
- पॉवरग्रिड कॉर्प 259
- अल्ट्राटेक सिमेंट 11522
- एशियन पेन्ट्स 2235
- एनटीपीसी 306
- अॅक्सिस बँक 1008
- भारती एअरटेल 1713
- आयटीसी 409
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1216
- मारुती सुझुकी 12660
- सिप्ला 1471
- ल्यूपिन 2055
- एसबीआय लाईफ 1467
- एसआरएफ 2841
- वेदान्ता 424
- हिंडाल्को 602
- कोल इंडिया 361
- अंबुजा सिमेंट 502
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अदानी पोर्ट 1109
- इन्फोसिस 1843
- टीसीएस 3909
- स्टेट बँक 727
- एचसीएल टेक 1705
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3268
- एचडीएफसी बँक 1697
- हिंदुस्थान युनि 2324
- आयसीआयसीआय 1248
- महिंद्रा-महिंद्रा 2978
- टाटा मोटर्स 683
- टेक महिंद्रा 1678
- कोलेगट 2477
- डाबर इंडिया 519
- बँक ऑफ बडोदा 210
- टीव्हीएस मोटर्स 2472
- आयशर मोटर्स 4817









