मुंबई
मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये दबाव दिसून आला होता. परिणामी आघाडीवरच्या 10 कंपन्यांचे बाजारमूल्य एकंदर 1 लाख 93 हजार 181 कोटी रुपयांनी घटले असल्याचे दिसून आले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक यांच्या बाजार मूल्यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
सुट्टीमुळे कमी दिवसाच्या मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1614 अंकांनी म्हणजेच 2.46 टक्के इतका घसरणीत राहिला होता. टीसीएस या कंपनीचे बाजार मूल्य 52 हजार 580 कोटी रुपयांनी घटून 12 लाख 25 हजार 983 कोटी रुपयांवर राहिले होते. बँकेचे बाजार भांडवल 40 हजार 562 कोटी रुपयांनी घटून 11 लाख 14 हजार 185 कोटी रुपये राहिले. दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचेही बाजार भांडवल 22 हजार 935 कोटी रुपयांनी मागच्या आठवड्यामध्ये कमी झालेले पाहायला मिळाले. यांचे बाजार भांडवल 15 लाख 32 हजार 595 कोटी रुपये इतके राहिले होते. आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसलाही मागच्या आठवड्यामध्ये नुकसानीचा सामना करावा लागला होता, त्यांचे बाजार भांडवल 19 हजार 320 कोटी रुपयांनी घटलेले दिसून आले.









