सेन्सेक्स 204 अंकांनी मजबूत : जागतिक वातावरणाचाही फायदा
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या चौथ्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक बाजारांमध्ये तेजीचा कल राहिला होता, याचा फायदा भारतीय बाजाराला झाला आहे. तसेच आर्थिक अहवालात गुरुवारी रिटेल महागाई दर मे महिन्यात कमी झाल्याचे म्हटले आहे. वरील घडामोडींचा सकारात्मक परिणाम शेअरबाजारात दिसून आला. यामध्ये रिटेल महागाई दर घटून 4.7 टक्क्यांवर राहिला असून हा टक्का 12 महिन्यातील सर्वात कमी राहिला आहे. यासह अमेरिकन पेंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या चालू वर्षातील व्याजदरातील कपातीच्या संकेतामुळे शेअर बाजाराला प्रोत्साहन मिळाले आहे. बीएसई सेन्सेक्स गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर 204.33 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.27 टक्क्यांसोबत 76,810.90 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 75.90 अंकांसोबत तेजी प्राप्त करत निर्देशांक 23,398.90 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 2.73 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच टायटन, लार्सन अॅण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो आणि बजाज फायनान्सचे समभाग हे मुख्यत: वधारुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग हे 1.64 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, भारती एअरटेल, आयटीसी, एनटीपीसी आणि टाटा मोर्ट्सचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. आर्थिक घडामोडींसंदर्भात व्याजदरात कपात करण्याच्या आरबीआयच्या अहवालामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. यासह कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि इंडस्ट्रीयल यांच्या समभागांची मजबूत खरेदी झाली.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- श्रीराम फायनान्स 2684
- एचडीएफसी लाईफ 593
- डिव्हिज लॅब 4593
- महिंद्रा अँड महिंद्रा 2861
- टायटन 3472
- लार्सन टुब्रो 3703
- एलटीआय माईंट्री 5047
- इंडसइंड बँक 1507
- टेक महिंद्रा 1388
- टीसीएस 3878
- विप्रो 482
- अल्ट्राटेक सिमेंट 11173
- बजाज फायनान्स 7294
- हिंडाल्को 680
- बीपीसीएल 619
- अदानी पोर्ट्स 1404
- बजाज फिनसर्व्ह 1590
- कोटक महिंद्रा 1726
- अपोलो हॉस्पिटल 6206
- डॉ. रे•ाrज लॅब्ज 6095
- इन्फोसिस 1493
- नेस्ले 2551
- एसबीआय 843
- हिरोमोटो कॉर्प 5816
- ओएनजीसी 276
- सनफार्मा 1510
- बजाज ऑटो 9923
- अदानी एंटरप्रायजेस 3224
- टाटा स्टील 182
- एशियन पेंट्स 2910
- रिलायन्स 2930
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एचयुएल 2487
- अॅक्सिस बँक 1174
- ब्रिटानिया 5379
- आयसीआयसीआय बँक 1107
- आयशर मोटर्स 4801
- पॉवरग्रीड कॉर्प 321
- टाटा कंझ्युमर प्रोडन्ट्स 1114
- भारती एअरटेल 1425
- आयटीसी 430
- एनटीपीसी 369









