जगातील तिसऱया नंबरचे व्यक्ती 18 व्या स्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरातील श्रीमंतांच्या यादीत आता एलॉन मस्क हे 246.2 अब्ज डॉलर्स सोबत अव्वल स्थानी आहेत. तर फोर्ब्सच्या रियल टाइमच्या आकडेवारीनुसार या यादीत गौतम अदानी 128.7 अब्ज डॉलर्ससोबत जगातील पाचवे धनाढय़ बनले आहेत. तर दुसऱया बाजूला मुकेश अंबानी हे 107 अब्ज डॉलर्ससह 7 व्या नंबरवर आहेत. तसेच झुकरबर्ग यांच्या क्रमवारीत मात्र मोठी घसरण झाली आहे.
श्रीमंतांच्या यादीत सर्वाधिक चर्चेत नाव राहिले आहे, ते फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांचे. 73.6 अब्ज डॉलर्ससोबत ते 14 व्या स्थानी राहिले होते. काही दिवसांपूर्वीच 18 व्या स्थानी ते घसरले असून यामध्ये कंपनीच्या सकारात्मक कामगिरीमुळे समभागांनी 20 टक्क्यांपर्यंत तेजी प्राप्त केली होती. मात्र आता झुकरबर्ग याच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पहिल्या तीनमध्ये असणारे झुकरबर्ग हे आता इतक्या खाली का घसरले आहेत, याची चर्चा उद्योग क्षेत्रात केली जात आहे.
वर्षभरातील स्थिती
एकवेळ फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 142 अब्ज डॉलर्ससोबत जगातील तिसरे सर्वात धनाढय़ ग्रहस्थ बनले होते. परंतु जुलै 2021 मध्ये झुकरबर्ग यांचे फेसबुकच्या समभागांची किमत ही 350 डॉलर्स होती तर कंपनीचे बाजारमूल्य 950 अब्ज डॉलर्स होते. तेव्हापासून आतापर्यंत संपत्ती 50 टक्क्यांनी कमी झाली आहे.
का घसरला फेसबुक ?
फेसबुकच्या समभागांमध्ये आलेल्या घसरणीमुळे झुकरबर्ग यांची संपत्ती निम्म्यावर आली आहे. जी मागील डिसेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार कंपनीचा नफा यामध्ये घटला होता. तसेच मेटाने मार्च 2022 तिमाहीसाठी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे कंपनीचे समभाग काही प्रमाणात घसरण होत बंद झाल्याचे दिसून आले.
झुकरबर्ग यांच्याकडील समभाग
डिसेंबर 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार झुकरबर्ग यांच्याकडे मेटा प्लॅटफॉर्मचे जवळपास 16.8 टक्के समभाग राहिले आहेत, जे फेसबुकची सहयोगी कंपनीचे आहेत. त्यांची संपती थेट फेसबुकशी जोडली गेली आहे. 2018 च्या दरम्यान झुकरबर्ग यांची संपत्ती वाढली आणि काही प्रमाणात घसरणही झाली आहे.









