प्रतिनिधी/ बेळगाव
निडगुंदी, ता. रायबाग येथील एका शेतजमिनीत गांजा पिकवणाऱ्या युवकाला अटक करून त्याच्याजवळून साडेचारशे किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
शिंगाडी माळाप्पा हिरेकोडी (वय 45) राहणार निडगुंदी असे त्याचे नाव आहे. जिल्हा सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी व अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनवळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम विभागाच्या मदतीने अचानक छापा टाकून ही कारवाई केली आहे.
शिंगाडीने आपल्या मालकीच्या शेतजमिनीत गांजाची लागवड केल्याचे समजताच पोलिसांनी अचानक छापा टाकून 205 गांजाची झाडे जप्त केली. 441 किलो 830 ग्रॅम कच्चा गांजा ताब्यात घेण्यात आला असून त्याची किंमत 22 लाख 9 हजार रुपयांहून अधिक होते.









