प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा पोलिसांनी येथील नवीन कदंब बसस्थानकावर छापा टाकून 18 लाखांचा हायड्रोपेनिक गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून लिओनार्ड देवा (22, रा. आराडी गिरी) याला अटक केली आहे.
म्हापसाचे पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. म्हापसा येथे संशयित अमलीपदार्थ घेऊन येणार होता याचा सुगावा पोलिसांना लागल्यावर पोलिस पथक स्थापन करुन हा छापा टाकण्यात आला होता. लिओनार्ड याची झाडाझडती घेतली असता त्याच्या जवळ 18 ग्रॅम गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत 18 लाख ऊपये आहे, अशी माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.









