ओडीसा येथील आरोपीस अटक
म्हापसा : सिकेरी बेनीअन ट्रीजवळ एक इसम अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार याची माहिती कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक, परेश नाईक यांना लागल्यावर उपनिरीक्षक परेश सीनारी यांच्या नेतृत्त्वाखाली पथक तयार करून छापा घालून दिपक रावत वय 35 रा. ओडीसा यांच्याकडे 8 किलो गांजाची पाने सापडली. पोलिंसानी ती जप्त केली असून आंतररष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत 8 लाख रुपये होते. पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी हवालदार विधानंद आमोणकर, शीपाई अमीर गरड, गणपत तिळोजी, आकाश नाईक, यांनी ही कारवाई केली अधीक्षक निधीन वालसन व निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केली. अमलीपदार्थ कायदा 1985 अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.









