मुंबई
बिस्किट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मॅरीको लिमिटेचा समभाग शेअरबाजारात 9 टक्के इतका वधारताना पहायला मिळाला. नफ्यामध्ये नोंदविलेल्या वाढीचा सकारात्मक परिणाम समभागावर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात दिसून आला. कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्राडे दरम्यान 9 टक्के वाढत 539 रुपयांवर पोहोचला होता. याआधीच्या सत्रामध्ये समभाग 493 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीच्या बाजार भांडवलात 68 हजार 404 कोटी रुपयांची भर पडली आहे.









